ग्रामपंचायत चांबळे

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३२ कुटुंबे राहतात. एकूण १५७५ लोकसंख्येपैकी ७७७ पुरुष तर ७९८ महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या १५६ असून त्यामध्ये अंदाजे ८० मुलगे व ७६ मुली आहेत.

मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) व काही प्रमाणात कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरी काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन सुद्धा करतात.

श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते.

ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक असते. ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते.

आदिवासी बांधवांना पावसाळ्यात या माध्यमातून अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
1575
पुरुष लोकसंख्या
777
महिला लोकसंख्या
798
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
156

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) होय  १  नाही 
उपकेंद्र (Sub Center) होय

1

होय
अंगणवाडी होय

२ 

होय
प्राथमिक शाळा होय १  होय
माध्यमिक शाळा होय
उच्च माध्यमिक शाळा नाही  नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र होय
समुदाय भवन (Community Hall) नाही  0 नाही
१० स्वस्त दर दुकान (PDS) होय १  होय
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय १  नाही
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर नाही 
नाही
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय 1 होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत चांबळे 

बँकेचे नाव :

शाखेचे नाव: चांबळे 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :  ग्रामपंचायत चांबळे 

 ता. – वाडा , जि. – पालघर ( 421303)